आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना:100 गाव; 11 पाड्यांवर टंचाईचे ढग

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत १५५ टक्के पाऊस झाला. पण शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जिल्ह्यातील १०० गावे आणि ११ पाड्यांमध्ये टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. धुळे आणि साक्री तालुक्यात यंदा चांगला तर शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे काही भागात टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे संभाव्य टंचाई आराखडा केला आहे.

त्यानूसार जानेवारी ते मार्च दरम्यान साक्री तालुक्यातील ६ गाव १ वाडी व शिंदखेडा तालुक्यातील १४ गावात टंचाईची शक्यता आहे. एप्रिल ते जून दरम्यान ७७ गावे आणि १० वाड्यांमध्ये टंचाईची शक्यता आहे. त्यात धुळे तालुक्यात १३ गावे व १ वाडी, साक्री तालुक्यात ३८ गावे व ५ वाड्या, शिरपूर तालुक्यात १४ गाव व ५ वाड्या, शिंदखेडा तालुक्यात ३२ गावांमध्ये टंचाई जाणवू शकते. येत्या सहा महिन्यांत ७७ गावे व १० वाड्यांमध्ये टंचाईची जाणवू शकते. या पार्श्वभूमीवर १ कोटी ४ लाख ८० हजारांचा टंचाई आराखडा करण्यात आला आहे.

अशा आहेत प्रस्तावित केलेल्या उपाययोजना
टंचाई निवारणार्थ धुळे तालुक्यात १४ उपाययाेजनांसाठी ५ लाख ४८ हजार, साक्री तालुक्यात ४३ योजनांसाठी १८ लाख १८ हजार, शिरपूर तालुक्यात १९ योजनांसाठी ८ लाख ४६ हजार, शिंदखेडा तालुक्यात ३५ योजनांसाठी सर्वाधिक ७२ लाख ६८ हजारांचा निधी प्रस्तावित आहे.

विंधन विहीर करण्यासह विहीर अधिग्रहण
टंचाई निवारण्यासाठी ३ विंधन विहीर करण्यासाठी १ लाख ८० हजार, ७१ गावे व २८ वाड्यांसाठी खासगी विहीर अधिग्रहण करण्यासाठी ४२ लाख ४८ हजार रुपये, विहीर खोलीकरणासाठी २ लाख, टँकरसाठी ३ लाख ३० हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.

बातम्या आणखी आहेत...