आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या २२ शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. संस्थेच्या शिरपूर येथील डॉ. व्ही. व्ही. रंधे इंग्लिश स्कूलमधील मन्सुरी झुल्फेकारने ९५.२० टक्के गुण मिळवून प्रथम, बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयातील गायत्री शिंदे व शिरपूर येथील डॉ. व्ही. व्ही. रंधे इंग्लिश स्कूलची लिकांक्षा पवार यांनी द्वितीय, अर्थे येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयातील कीर्ती बडगुजरने ९३.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, आशा रंधे, राहुल रंधे, रोहित रंधे, श्यामकांत पाटील, सीमा रंधे, हर्षाली रंधे, आनंदसिंग राऊळ, डॉ. जितेंद्र चित्ते, राजेंद्र अग्रवाल आदींचे मार्गदर्शन लाभले.
रणधीर स्कूलचा १०० टक्के लागला निकाल
शिरपूर येथील डॉ. विजयराव व्यंकटराव रणधीर इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्रमांक मन्सुरी लिझा ९५.२० टक्के, द्वितीय लीकांक्षा पवार ९४.६० टक्के, तृतीय क्रमांक किष्णा मराठे ९२.८० टक्के यांनी मिळवला.
शंकर पांडू माळी शाळा
वरवाडे येथील शंकर पांडू माळी माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्रमांक भरत पावरा ९०.४० टक्के, द्वितीय स्वामी पावरा ८९.४० टक्के, तृतीय क्रमांक दिव्या पावरा ८९.२० टक्के यांनी मिळवला.
पंडित नेहरू विद्यालय
शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा निकाल १०० लागला. प्रथम क्रमांक कुणाल पाटील ८८.०० टक्के, द्वितीय लोकेश बडगुजर ८७.२० टक्के, तृतीय क्रमांक विवेक सगरे ८७ टक्के यांनी मिळवला.
फुले, डॉ. आंबेडकर विद्यालय
जातोडा येथील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्रमांक जयेश वाघ ८२.०० टक्के, द्वितीय भावना राजपूत व घनश्याम धनगर ८१.८० टक्के तर तृतीय ज्ञानेश्वर राजपूत ८०.८० टक्के यांनी मिळवला.
थाळनेरची संत गाडगे महाराज शाळा
थाळनेर येथील संत गाडगे महाराज माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९२.५९ टक्के लागला. प्रथम क्रमांक अश्विनी कोळी ८९.४० टक्के, द्वितीय रोशनी कोळी ८९.२० टक्के तृतीय नीता माळी ८८.८० टक्के यांनी मिळवला.
बनुमाय कन्या विद्यालय
बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला. प्रथम क्रमांक गायत्री शिंदे ९४.६० टक्के, द्वितीय तन्वी देसले ९१.६० टक्के, तृतीय क्रमांक पूजा सोनवणे ९१.४० टक्के यांनी मिळवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.