आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिटर दूध:राजा 11 लाखांचा, खुराकात पितो रोज पाच लिटर दूध

सारंगखेडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजा नावाचा घोडा दोन पायावर नाचून पर्यटकांचे लक्ष वेधत आहे. यात्रेकरून त्याच्याकडे कुतूहलाने आकर्षित होत आहेत.राजा ने पाय वरती केले की टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करतात. राजाची किंमत तब्बल ११ लाख रुपये लावली आहे. त्याला पंजाबच्या रफ्तार सिंग यांनी ५ लाखाची मागणी केलेली आहे. त्याची उंची ६१ इंची आहे. त्याचे वय फक्त १६ महिने आहे. त्याला रोज खाण्यासाठी चणा, गहूचा भुसा व प्यायला ५ लिटर दुध लागते, अशी माहिती बरेली उत्तर प्रदेशचे सलीम बापू यांनी दिली. तसेच त्यांचा सलमान नावाच्या घोड्याने अकलूजच्या घोडेबाजारात अश्व सौंदर्य स्पर्धेत चौथा आलेला आहे. त्या घोड्याला देखील विक्रीसाठी दाखल केला आहे.

‘चेतक’ एक्वाईन प्रीमियर लीगसाठी घोड्यांची तालीम
रेहान स्टर्ड फार्म नाशिक येथील सवायसिंग त्यांच्या प्रिन्स नावाच्या घोड्याला प्रशिक्षण देत आहेत. प्रीमियर लीगसाठी त्याच्याकडून विविध क्रियाकलाप करून घेतल्या जात आहेत. रायडिंग, जम्पिंग, टेंट पेगिंग यासारख्या कला शिकवल्या जात आहेत. सवायसिंग मागच्या १५ वर्षांपासून हॉर्स रायडिंग करत आहेत. चेतक फेस्टिवलच्या रेसिंग ट्रॅकवर सराव चालू आहे. सवायसिंग जोधपूर राजस्थान येथील आहेत.

बातम्या आणखी आहेत...