आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केशरानंद समूहाचा उपक्रम:11 हजार कामगंध सापळे शिंदखेड्यात वाटप करणार

शिंदखेडा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉटन असोसिएशन आॅफ इंडियातर्फे केशरानंद उद्योग समूहाच्या सहकार्याने ११ हजार कामगंध सापळ्यांचे मोफत वाटप होणार आहे. हा कार्यक्रम १५ सप्टेंबरला सकाळी दहा वाजता शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील केशरानंद जिनिंग अॅण्ड प्रेसिंग येथे होईल.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक रितू पांड्या सुधीर, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी उज्ज्वल गिरासे, उपविभागीय कृषी अधिकारी मालपुरे, शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, केशरानंद उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्वर भामरे, संचालक रविराज भामरे, शिवराज भामरे, डॉ. महेंद्र बोरसे आदी उपस्थित असतील. शिंदखेडा तालुक्यात दरवर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी कामगंध सापळे वाटप होणार आहे. पहिल्यांदाच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हा उपक्रम राबवण्यात येतो आहे. शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ज्ञानेश्वर भामरे यांनी केले आहे.

प्रथमच झाला निर्णय
शेतकऱ्यांना कॉटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे मदत दिली जात नाही, असा प्रश्न असोसिएशनच्या बैठकीत मांडला होता. त्यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष अतुल घनतरा यांनी शेतकऱ्यांना कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कॉटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ११ हजार कामगंध सापळे देण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...