आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील महावीर कॉलनीतील चोरीनंतर तिसऱ्याच दिवशी पुन्हा येथील शिवशक्ती कॉलनीत सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन भामट्यांनी ११ तोळे सोने लंपास केले. शिवशक्ती कॉलनीत राहणाऱ्या पांडुरंग सोनवणे यांच्या कुटुंबातीत ही घटना घडली.
येथील शिवशक्ती काॅलनीत पांडुरंग सोनवणे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा दुकानावर कामासाठी गेला होता. घरी फक्त पांडुरंग सोनवणे, त्यांच्या वृद्ध पत्नी चतुरबाई आणि वीस वर्षांची नात होते. सकाळी अकराच्या सुमारास दोन तरुण टीव्ही, काचेच्या वस्तू, टेबल पुसण्याची पावडर विकण्याच्या बहाण्याने घरासमोर आले. त्यांनी चांदीची गणपतीची मूर्ती पावडरने चकाचक करून दाखवली. याचवेळी चतुरबाईच्या हातात असलेल्या सोन्याच्या पाटल्या आणि बांगड्याही चकाचक पॉलिश करून दाखवतो, असे सांगितले. त्यांनी दागिने हातातून काढून दिले. त्यानंतर त्यांनी डबा आणून त्यात पाणी टाकायला सांगितले. नंतर दुसरी वस्तू घेण्यास पाठवले. या वेळी दागिणे गाढून घेत डबा देऊन तो पाच मिनिटे गॅसवर ठेवण्यासा सांगितले. दहा मिनिटानंतर त्याला उघडावे तुमच्या बांगड्या चकाचक चमकताना दिसतील असे सांगून पाबोरा केला. त्यानंतर घरातील नातला संशय आल्याने गॅसवर डबा ठेवताच तिने डबा हलवून पाहिला. मात्र त्यातून केवळ पाण्याचा आवाज येत होता. तिला संशय आल्याने तिने डबा उघडून पाहिला. डबा लवकर उघडला जात नव्हता. डबा उघडल्यावर त्यात एकही दागिना नव्हता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.