आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचारक:शिंदखेडा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 112 स्पर्धकांचा सहभाग

शिंदखेडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेटावद येथील जनता विद्या प्रसारक संस्थेच्या फ. म. ललवाणी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिंदखेडा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले. प्रदर्शनात प्राथमिक गटातून ४१, माध्यमिक गटातून ६१ विद्यार्थ्यांनी तर शिक्षक गटातून ७ व ३ प्रयोग परिचारक अशा एकूण ११२ जणांनी सहभाग नोंदवला.

प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक गुजर अध्यक्षस्थानी होते. पंचायत समितीच्या सभापती अनिता पवार, कामराज निकम, जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम, वर्शीचे गटाचे जिल्हा परिषद सदस्य डी. आर. पाटील, कृषिभूषण प्रकाश पाटील, कपिलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष सिद्धार्थ पवार, पंचायत समितीचे उपसभापती राजेश पाटील, बेटावदच्या सरपंच सुशीला कोळी, पंचायत समिती सदस्य नंदिनी कोळी, विज्ञान अध्यापक मंडळाचे कार्याध्यक्ष संजय पवार, गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील, विस्तार अधिकारी डी. एस. सोनवणे, सी. जी. बोरसे, शैलेजा शिंदे, केंद्रप्रमुख जगदीश पाटील, सी.एस. खर्डे, बी. बी. भील, तालुका विज्ञान गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष रवींद्र चित्ते, सचिव एस. एन. माळी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...