आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत 112 खेळाडू

धुळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा कार्यालय व छत्रपती शिवाजी राजे व्यायाम व क्रीडा मंडळ संचलित व्हिजन बॅडमिंटन अकॅडमीतर्फे २१ वी खुली बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये झाली. स्पर्धेत ११, १३ १५ व १७ वर्षे वयोगटातील मुले, मुली सहभागी झाल्या होत्या.स्पर्धेचे उद्घाटन प्रा.के. एम. बोरसे, ज्योती बोरसे, राहुल बाविस्कर, प्रशांत येवले यांच्या हस्ते झाले. उपप्राचार्य के.एम. बोरसे म्हणाले की, खेळ व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाने रोज एक तास खेळले पाहिजे असेही ते म्हणाले.

स्पर्धेत ११२ खेळाडूंनी वेगवेगळ्या वयोगटात सहभाग नोंदवला. स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रितेश ठाकूर, प्रा. विजय पाटील यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत ११ वर्षे वयोगटात मुलांमध्ये एकेरी गटात मानस शिंदे, मुलींमध्ये अनया खैरनार, १३ वर्षाच्या आतील गटात मुलांमध्ये जनक अग्रवाल, मुलींमध्ये उर्वी शिंदेने विजेतेपद मिळवले.तसेच उपविजेतेपद जानवी पाटीलने मिळवले. १५ वर्षाच्या आतील गटात मुलांमध्ये अपूर्व सुभेदार विजेता, प्रणव कोकांदे उपविजेता ठरला. मुलींमध्ये ऋतू भावसार विजयी तर उपविजेती ख्याती चित्ते ठरली. १७ वर्षाच्या आतील गटात मुलांमध्ये अपूर्व सुभेदार विजेता तर उपविजेता साहिल देवरे ठरला. मुलींमध्ये ऋतू भावसार विजयी तर उपविजेती कावेरी भदाणे ठरली. खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक शरतान चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...