आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणारी योजना म्हणून शहादा-शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीकाठावरील उपसा सिंचन योजनांसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ११५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने या बंद पडलेल्या उपसा योजना सुरू होतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहाेचेल,अशी राष्ट्रवादी काँग्रेसने जनसामान्यांचा विचार करून विविध योजना राबवून राज्याचा विकास करत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी पत्रपरिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेस जि.प. सदस्य मोहन शेवाळे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी जोशी, सरचिटणीस अलका जोंधळे, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष दानिश पठाण, तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, संघटक विनोद अहिरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष छोटू कुवर, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष संतोष पराडके, युवक तालुकाध्यक्ष महेंद्र कुवर, कार्याध्यक्ष शुभम कुवर आदी उपस्थित होते
जिल्हाध्यक्ष मोरे यांनी, २०१९ पासून सरकारसोबत पक्षाने केलेल्या कामांची माहिती दिली. सरकारतर्फे सर्व योजना सामान्य माणसाला केंद्रस्थानी मानून तयार करून राबवल्या जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.