आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपूर्ण:12 किलोमीटरची नालेसफाई अपूर्ण ; हद्दवाढीतील नाल्यातील झुडपेही काढणार

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात येते. त्याप्रमाणे मे महिन्याच्या उत्तरार्धात शहरातील नालेसफाई कामाला सुरुवात केली. शहरातील प्रमुख नाल्याची ३२ किलोमीटर सफाई करावयाची होती. त्याप्रमाणे आतापर्यंत २० किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. तर हद्दवाढीतील नाल्यामध्ये काटेरी झुडपे काढण्याचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. शहरातील नाल्यांची जवळपास ३२ किलोमीटर लांबी आहे. त्याकरिता जेसीबी व स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे प्रमुख नाल्यांची सफाई करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २० किलोमीटर नालेसफाई काम पूर्ण झाले आहे. त्यातील कचरा, गाळ काढण्यात येऊन पाणी वाहते करण्यात आले आहे. पावसाळ्यात पूरस्थिती जरी निर्माण झाली तरी पाणी वाहून निघावयास हवे. अन्यथा पाणी तुंबून काठावरील घरात पाणी शिरण्याची भीती असते. नालेसफाई मंगळवारपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर हद्दवाढीतील वलवाडी, मोराणे, वरखेडी, नकाणे या भागातील नाल्यांमधील काटेरी झुडपे काढण्याचे काम सुरू होईल.

अशी आहे यंत्रणा महापालिकेतर्फे शहरातील प्रमुख नाले, सुशी नाला, मोती नाला, मध्यवर्ती नाला, लोंढी नाला, पारोळा रोडवरील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळून वाहणारा नाला, जीटीपी चौकातील नाल्याची सफाई केली आहे. याकरिता दोन जेसीबी भाडेतत्त्वावर व एक महापालिकेचा जेसीबीद्वारे नाले सफाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जेथे जेसीबी जाणे शक्य नाही ते काम सफाई कर्मचाऱ्यांतर्फे केले आहे. याकरिता १०० सफाई कर्मचारी नियुक्त होते, अशी माहिती मनपातून मिळाली.

बातम्या आणखी आहेत...