आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव:मनपा हद्दीतील 10 गावांत 135 रस्त्यांसाठी 126 कोटींचा प्रस्ताव

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या हद्दीतील दहा गावांमधील रस्त्यांची दैना झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यानुसार १३५ प्रमुख रस्त्यांसाठी १२६ कोटींचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच निधी प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त आहे. याशिवाय हद्दवाढीतील गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

महापालिका हद्दीत ५ जानेवारी २०१८मध्ये शहरपासून जवळ असलेल्या १० गावांचा समावेश झाला. त्यानंतर दहा गावांच्या ग्रामपंचायतीचे दप्तर महापालिकेने ताब्यात घेतले. मनपा हद्दीत आल्यामुळे विविध सोयी-सुविधा मिळतील अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण हद्दवाढ होऊन चार वर्षे झाले तरी चित्र फारसे बदलले नाही. मनपा हद्दीतील अनेक गावांत रस्ते व गटारी नाही. पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे.

पावसाळ्यात अनेक भागातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य असते. सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी वाढीव मालमत्ता कर भरण्यास विरोध केला आहे. हद्दवाढीतील गावात सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी यापूर्वी ३५० काेटींचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. तो मंजूर झाला नाही. त्यानंतर आता या प्रस्तावात बदल करून फक्त रस्ते व गटारींसाठी १२६ कोटींचा नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्यात भाजप सत्तेत असून महापालिकेतही त्यांचीच सत्ता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत निधी मिळण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

हरित क्षेत्र, क्रीडांगण आराखडा
मनपा हद्दीतील गावांचे सर्वेक्षण करण्यात येते आहे. त्याचबरोबर या सर्वेक्षणानुसार सर्व दहा गावांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यात वसाहती क्षेत्र, शाळा, महाविद्यालये, मोकळे मैदान, हरित क्षेत्र, क्रीडांगणे, व्यावसायिक क्षेत्राचा समावेश असेल. हा आराखडा पूर्ण झाल्यावर शासनाला देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

बातम्या आणखी आहेत...