आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराला गुरुवारी रात्री अकरा वाजेनंतर पावसाने झोडपले. फक्त ४ तासात १२८ मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे देवपूरातील वलवाडी परिसरातील बहुतांश वसाहतीतील रस्ते पाण्याखाली गेले होते. देवपूरातील भरत नगरपासून गोकर्ण सोसायटीपर्यंत रस्त्यावर पाणी होते. या भागातील नागरिकांना शुक्रवारी सकाळी घरातून बाहेर पडण्यासाठी कसरत करावी लागली. अनेक शाळांच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. शहरात २० वर्षानंतर असा ढगफुटी सदृष्य पाऊस झाला.
शहरात गुरुवारी दिवसभर उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यानंतर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सूरूवात झाली. रात्री साधारण साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास पावसाने जोर धरला. त्यानंतर सलग दोन ते अडीच तास पावसाने शहराला झोडपले. पहाटे तीन वाजेपर्यंत पाऊस सुरू हाेता. वलवाडी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. वलवाडी आणि देवपूर परिसरातील गटारी निमुळत्या असल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. तसेच नाल्याला पुर आला होता. सकाळी विद्यार्थ्यांना पाण्यातून शाळेत जावे लागले.
रस्त्याच्या कामामुळे देवपुरात बस फसली
झेड. बी. पाटील महाविद्यालयासमोरील रस्त्याचे काम दोन महिन्यापासून सुरु आहे. त्यामुळे बस नेताजी मैदानाजवळील रस्त्यावरून जातात. सकाळी धुळे-म्हसाळे बस क्रमांक एमएच-२०-बीएल- ०९१९ म्हसाळेकडे जात असताना जयहिंद इंग्लिश मीडियम शाळेच्या समोर फसली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.