आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांचे सहकार्य:भोईराज तरुण मित्र मंडळातर्फे आयोजित शिबिरात १३३ जणांचे कोविड लसीकरण

शहादा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भोईराज तरुण मित्र मंडळातर्फे ५ सप्टेंबर रोजी कोविड लसीकरण शिबिर झाले. या वेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय साठे, किशोर मोरे, दिलीप खेडकर, मोहन साठेसह मंडळाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. लसीकरण शिबिरासाठी शहादा नगरपालिका रुग्णालयाचे आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.

या कोविड लसीकरण शिबिरात पहिला डोस दुसरा डोस व बूस्टर डोस एकूण १३३ लाभार्थींना देण्यात आले. एकंदरित शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. गणेश उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. विविध उपक्रम राबवल्यास युवकांना प्रोत्साहन मिळते, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संजय साठे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...