आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:सोनगीरला 138 दात्यांचे रक्तदान; गुरू गोविंद महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त शिबिर

सोनगीर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री गुरू गोविंद महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा शताब्दी महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात १३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

येथील आनंदवन संस्थान व ग्रामस्थांतर्फे संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम होता आहे. त्यानुसार ११ ते ३० जून दरम्यान वैद्यकीय शिबिर होणार आहे. त्यानुसार १८ जूनपर्यंत सकाळी सात ते दुपारी एक दरम्यान श्री अवधूत शेटे यांचे ॲक्युप्रेशर व ॲक्युपंक्चर उपचार शिबिर होणार आहे.

याशिवाय दंत तपासणी, रक्तगट तपासणी शिबिर झाले. रक्तदान शिबिरात १३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. नवरदेव प्रशांत नाना माळी यांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी रक्तदान केले. या वेळी आनंदवन संस्थानचे मठाधिपती डॉ. मुकुंदराज महारााज, सुधन भट, विकास कुंटे, माजी पंचायत समिती सदस्य अविनाश महाजन, किशोर पावनकर, पराग देशमुख, सुनील माळी, जितेंद्र बागुल, अमित बागुल, अमोल बागुल, संदीप गुजर, राजू पाडवी, अंकित कासार, सोनू माळी, गोपाल माळी, संदीप कासार, नाना रामदास माळी, बिराज कचरू माळी, माजी उपसरपंच कैलास वाणी, दिनेश देवरे, अनिल कासार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...