आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा... नवले यांची माहिती:मिल परिसरात विकास कामांसाठी 15 कोटी मंजूर

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या मिल परिसरातील प्रभाग क्रमांक १६ व १७ मध्ये विविध विकास कामे करण्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले. खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या सहकार्याने निधी मिळाल्याची माहिती स्थायी समिती सभापती शीतल नवले यांनी दिली.

निधीसाठी सभापती शीतल नवले यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर प्रदीप कर्पे यांच्याकडे पाठपुरावा केला. नगरोत्थान महाभियानांतर्गत देवपूर आणि विविध प्रभागातील ४१ विकास कामांसाठी ६० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून १५ कोटी मिल परिसरासाठी देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...