आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पथसंचनालनासाठी रोज १५ ते १८ तास सराव; एनसीसी सिनिअर अंडर ऑफीसर कुसुम प्रेमाणीची माहिती, मिळाली तीन पदकेही

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयातील एनसीसी सिनिअर अंडर ऑफीसर कुसुम प्रेमाणीने स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीत झालेल्या पथसंचनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. जिल्ह्यातील महिला कॅडेटला प्रथमच ही संधी मिळाली. स्वातंत्र्य दिनाच्या पथसंचलनासाठी सलग १५ दिवस रोज १५ ते १८ तास सराव केला. तसेच एनसीसी शिबिरात तीन पदके मिळाली अशी माहिती कुसुमने ‘दिव्य मराठी’शी बोलतांना दिली.

दिल्लीत स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील एनसीसीच्या पथकाचे पथसंचलन झाले. या पथकाचे नेतृत्त्व शहरातील कुसुम सुरेश प्रेमाणीने केले. ती नुकतीच घरी परतली. कॅम्पच्या अनुभवाविषयी कुसुमने सांगितले की, कॅम्पमध्ये निवड होण्यापूर्वी आरडीसी शिबिर नागालँड येथे होणार होते. हे शिबिर पुढे ढकलल्याने स्वातंत्र्य दिनाच्या कॅम्पमध्ये रिप्लेस करण्यात आले. आरडीसी कॅम्पला जाण्यासाठी धुळे, औरगांबाद, नांदेड तेथून नागपूर आणि मग दिल्लीला दाखल झाले. १५ ऑगस्टच्या पथसंचलनसाठी सलग १५ दिवस सराव सुरु होता. रोज रात्री २ वाजेला उठावे लागत होते. रात्री २ ते २.३० पीटी, त्यानंतर पहाटे ३.३० वाजता लाल किल्यावर जात होते. त्या ठिकाणी संपूर्ण देशभरातील छात्रसैनिक येत होते. या ठिकाणी पथसंचालनाची रंगीत तालिम तसेच इतर राज्यातील छात्रसैनिकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. संस्कृतीचे आदान प्रदान झाले. सराव झाल्यावर रोज सकाळी ९.३० वाजता एक तासाचा ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा प्रशिक्षण सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम होत होते. शिबिरात मालदीव, युईई, अमेरिकेचे छात्रसैनिक सहभागी झाले होते. रोज सायंकाळी क्रीडा स्पर्धा होत होत्या.

रात्री साडेनऊ वाजता जेवण, पुन्हा १० ते ११ वाजेपर्यंत कार्यक्रम असायचा. कठोर परिश्रम, सातत्य, मार्गदर्शनानंतर १५ ऑगस्टला परेड झाली. परडेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनसीसी छात्रसैनिकांशी संवाद साधला. या वेळी केंद्रीय सरंक्षणमंत्री, सरंक्षण राज्यमंत्री, खेळाडू उपस्थित होते. धुळ्यातून जातांना एसएसव्हीपीएसची कॅडेट म्हणून गेले. औरंगाबादला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. दिल्लीत ३ ऑगस्ट रोजी झालेल्या निवडीनंतर महाराष्ट्राच्या एनसीसीच्या ग्रुपच्या संचलनाची संधी मिळाली. ही आयुष्यातील मोठी पर्वणी असल्याचे कुसुमने सांगितले. त्यासाठी एनसीसीचे कर्नल बी. व्ही. एस. शिवाराव, प्रशासकीय अधिकारी कर्नल पराग कुलकर्णी, प्राचार्य मनोहर टी. पाटील, कॅप्टन डॉ. महेंद्रकुमार वाढे, लेफ्टनंट क्रांती शशिकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती एनसीसी सिनिअर अंडर ऑफीसर कुसुम प्रेमाणीने दिली.

सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न
सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न आहे. यापूर्वी एनडीए परिक्षेत थोडक्यात अपयश आले. आता एसएसबी आणि सीडीएसची तयारी सुरु असल्याचे कुसुमने सांगितले. कुसुमचे वडील मॅकनिक असून ती सर्वसाधारण कुटुंबातील आहे. कुसुमने दिल्लीतील शिबिरात तीन पदक पटकावले. त्यात संस्कृती, वकृत्व स्पर्धेसह पथसंचलनात मिळालेल्या पदकाचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...