आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष लागवड:पर्यावरण रक्षणासाठी भोरखेडा परिसरात 150 एकर बांबू लागवड ; संवर्धनासाठी 25 वर्षांपासून धडपड करताहेत शिवाजीराव राजपूत

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातून अधिकच्या उत्पन्नवाढीच्या मोहामुळे सर्रासपणे रासायनिक खतांचा वापर होतो, परिणामी जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. ती थांबावी यासाठी शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील शेतकरी शिवाजीराव राजपूत यांनी स्वत:च्या २८ एकर क्षेत्रात बांबूची शेती फुलवली आहे. या शिवाय इतर शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करत त्यांनी परिसरात तब्बल १५० एकर क्षेत्रात बांबू लागवडीत यश मिळवले आहे. मागील २५ वर्षांपासून शिवाजीराव राजपूत हे वृक्ष लागवड, संवर्धन आणि संगोपनाची चळवळ चालवत आहेत. त्यांनी साधारण पाच लाख रोपांचे वाटप केले आहे. शिवाजीराव राजपूत हे प्रगतिशील शेतकरी, पर्यावरणप्रेमी आहेत. शेतीतून उत्पादन घेत असताना शेतीचा पोत खालावणार नाही. याकरिता वृक्ष लागवड आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्या २५ वर्षांपासून शिवाजीराव राजपूत यांनी वृक्ष लागवड आणि संगोपनाची मोहीम हाती घेतली आहे. याकरिता लोकांमध्ये प्रबोधन करणे आणि वृक्ष लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम राजपूत करत असतात.

३० टक्के ऑक्सिजन जास्त सोडतो बांबू पर्यावरण संवर्धनासह बांबूच्या विक्रीतून उत्पन्न असा दुहेरी हेतू डोळ्यांसमोर ठेवत राजपूत यांनी बांबू लागवडीचा मार्ग निवडला आहे. बांबू इतर वृक्षापेक्षा ३० टक्के ऑक्सिजन जास्त सोडतो आणि ३५ टक्के कार्बन डायऑक्साइड शोषूण घेतो. यामुळे बांबू लागवड फायदेशीर आहे.तर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास, ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. या उद्देशाने त्यांनी बांबू लागवडीवर लक्ष केंद्रित केले.

वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी गौरव शिवाजीराव राजपूत यांच्या वृक्ष लागवड संगोपनाच्या चळवळीची दखल घेत त्यांना केंद्र शासनाच्या वतीने इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार देण्यात आला आहे.या शिवाय विविध सामाजिक संस्थांनी पर्यावरण संवर्धनासाठी विविध पुरस्कार दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...