आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध मद्य हस्तगत:पळासनेरजवळ 150 खोके अवैध विदेशी मद्य हस्तगत, चालक ताब्यात; 9 लाख 72 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त

शिरपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळील एका हॉटेलसमोर सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने सेंधव्याकडून येणाऱ्या एका पिकअपमधून १५० खोके विदेशी मद्यासह बिअर जप्त केली. या कारवाईत वाहनासह ९ लाख ७२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बोराडी येथील वाहन चालकाला ताब्यात करण्यात आले. ही कारवाई गुरूवारी सायकाळी साडेसात वाजेच्या सुमारास करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी. एस. महाडिक यांना पिकअपमधून एमएच-४८, टी- ४३६० मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या विषयीची माहिती दुय्यम निरीक्षक अतुल शिंदे यांना दिली. दुय्यम निरीक्षक सागर चव्हाण, एन.व्ही. ढगे, केतन जाधव, मनोज धुळेकर, रवींद्र देसले, शांतीलाल देवरे यांनी पळासनेर गावाजवळ सापळा रचला. तसेच सेंधव्याकडून भरधाव वेगाने येणारी पिकअप थांबवली. या वेळी चालक मुकेश बाळासाहेब पाटील रा. बोराडी याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर पथकाने पिकअपची तपासणी केली.

त्या वेळी पिकअपमध्ये मद्यासह बिअरचे एकूण १५० खोके आढळले. हा मद्यसाठा मध्य प्रदेशमध्ये निर्मित असून तो त्याच राज्यात विक्रीसाठी आहे. हा साठा शिरपूरकडे आणला जात होता. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई येथील आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक उषा शर्मा, नाशिक विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, धुळे येथील अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, शिरपूर तालुक्यात यापूर्वीही अवैध मद्य पकडण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...