आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:गोवरचे नव्याने १७ पॉझिटिव्ह रुग्ण; घाबरून न जाता लसीकरण करावे

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात काही दिवसांपासून गोवर आजाराचे रुग्ण आढळत आहे. त्याकरिता महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे घरोघरी बालकांचेे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. शहरात आता नव्याने १७ गोवर रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याप्रमाणे आतापर्यंत २७ गोवर रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात गोवर रुग्ण नोव्हेंबर महिन्यापासून आढळण्यास सुरुवात झालेली आहे.

त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे महापालिकेच्या पाच नागरिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरात आशा वर्कर, नर्सेस व एमपीडब्ल्यू यांच्यातर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. यात गोवर संशयित रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे त्यांच्या रक्ताचे नमुने देखील घेण्यात येत आहे. गोवर संशयित रुग्ण देखील आढळत आहे. याकरिता आता ५ वर्षांपर्यंतच्या बालकांचे लसीकरणाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तर २६ परिचारिका, १५० आशा वर्कर, १५ एमपी डब्ल्यूंचा सर्वेक्षण करणाऱ्या पथकात समावेश आहे.

असे सुरू आहे सर्वेक्षण
यात ५ वर्षांपर्यंतच्या किती बालकांनी गोवरची लस घेतली आहे. किती जणांची राहिली आहे. त्यांनी इतर लसीकरण केेले आहे काय याची सर्व माहिती घेण्यात येऊन ५ वर्षापर्यंत ज्या बालकांचे लसीकरण राहिले त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. तर ज्यांचे दोन्ही लस घेतले त्यांना बूस्टर डोस देत आहे.

१८८ संशयित गोवर रुग्णांची झाली नोंद
शहरात मागील महिन्यात रक्त नमुने घेण्यात आले होते. त्यात १० गोवर पॉझिटिव्ह होते. तर उर्वरित बालकांचा रक्तनमुने अहवाल प्राप्त झाला असून, त्यात १७ बालकांना गोवर झाल्याचा अहवाल आहे. याप्रमाणे आतापर्यंत २७ गोवर रुग्ण बालकांची नोंद करण्यात आली आहे. तर १८८ संशयित गोवर रुग्णांची नोंद झालीय.

शहरात १ हजार ५२६ बालकांचे लसीकरण
शहारात गोवरसदृश लक्षणे आढळून आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण व लसीकरण करण्यात येत आहे. यात दिनांक ६ डिसेंबरपर्यंत १ हजार ५२६ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे
शहरात गोवरचे संशयित रुग्ण आढळून येत आहे. महापालिकेतर्फे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पालकांनी सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेशी माहिती देऊन सहकार्य करावे. म्हणजे गोवरची साथ आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे. -डॉ. एम.आर. शेख, मनपा आरोग्य अधिकारी

बातम्या आणखी आहेत...