आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:पदवीधरसाठी 17 हजार मतदारांची नोंदणी

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदणीची प्रक्रिया ऑक्टाेबर महिन्यापासून सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यात आत्तापर्यंत १७ हजार मतदारांनी नाव नोंदवले आहे. ही संख्या गेल्या निवडणुकीपेक्षा कमी आहे. नोंदणीची मुदत २ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने सर्व मतदारांना नावनोंदणी करावी लागणार आहे. आॅनलाइन, आॅफलाइन पद्धतीने नावनोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. पण नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

यंदा राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांकडून होणाऱ्या एक गठ्ठा नाव नाेंदणीवर प्रतिबंध आहे. प्रत्यक्ष मतदार अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य नावनाेंदणी करू शकतात. मतदारांना पुन्हा २३ नाेव्हेबंर २ डिसेंबरपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी करावी. नाव नाेंदणीसाठी तीन वर्षांपूर्वी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अथवा पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांसह फार्म क्रमांक १८ भरून दिल्यावर नावनाेंदणी करता येईल.

बातम्या आणखी आहेत...