आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका प्रशासनातर्फे नोटीस:शहरात एक लाखापेक्षा अधिक कर थकवणारे 172 मालमत्ताधारक

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात एक लाखा पेक्षा जास्त मालमत्ताकर थकवणाऱ्यांचा आकडा १७२ वर गेला आहे. संबंधिताना महापालिका प्रशासनातर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. थकबाकी भरली नाही तर मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मालमत्ता करातून प्राप्त हाेते. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीवर जास्त लक्ष केंद्रित केले जाते.

त्यासाठी वसुली विभागातील कर्मचारी घरोघरी जात कराची नोटीस देण्यास कर वसूल करतात. कर भरण्यासाठी महापालिकेत बँकेचे स्वतंत्र काउंटर सुरू झाले आहे. तसेच मोबाइल अॅपच्या मदतीनेही कर भरता येतो. त्यानंतरही अनेक जण मालमत्ता कर भरत नाही.

त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील १७२ मालमत्ताधारकांनी १ लाखापेक्षा अधिक कर थकवला आहे. सर्वांना नोटीस देण्यात आली आहे. शहरात कर वसुलीपोटी ३० कोटी २२ लाख ७२ हजार रुपये थकले आहे. शास्तीची रक्कम ३० कोटी ५७ लाख ५३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...