आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळोदा पालिकेत विविध संवर्गातील ८ पदांसह एकूण १८ पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून नागरिकांचेही हाल होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्वरित आकृतिबंध आराखडा मंजूर करावा, अशी मागणी होत आहे, तळोदा पालिकेच्या आस्थापनात नगरविकास खात्याकडून २००६ च्या निर्देशानुसार सदर आकृती बंधाप्रमाणे स्थानिक आस्थापना एकूण ११ व राज्य निवड माध्यमातून भरण्याचे ८ अशी एकूण १९ पदे रिक्त आहेत. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळेच पालिका हद्द वाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र त्या तुलनेत रिक्त जागाही वाढत असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर अधिक ताण पडत असून कामाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच आहे. या बाबत पालिकेने वरिष्ठ पातळीवर माहिती पाठवली असून त्यास जिल्हा प्रशासनाकडून कधी मंजुरी मिळते, या कडे लक्ष लागून आहे. कारण या रिक्त पदांची नेमणूक जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून होणार असून काही पदे स्थानिक प्रशासन भरणार आहे. त्यात अनुकंपा तत्त्वानुसारही पदे भरण्यात येणार असल्याचे समजते. न.पा. कार्यालय आगामी मार्च महिन्यात नवीन व्यापारी संकुलात स्थलांतर होणार असल्याने विविध विभागात कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे.
राज्य संवर्ग (ब) श्रेणी व (क) - नगर अभियंता - १ नगर अभियंता १, अभियंता संगणक- १, पाणीपुरवठा व जलनिस्सारण स्वच्छता अभियंता - १, लेखा परीक्षक (ब) १, कार्यालयीन अधीक्षक १, कर निरीक्षक १, सहायक खरेदी भांडार पर्यवेक्षक १, माहिती आणि जनसंपर्क पर्यवेक्षक १, सहाय्यक अग्निशामक स्थानक पर्यवेक्षक १, नगर रचना कर १ अशी एकूण राज्य संवर्गातील ११ महत्त्वाची पदे रिक्त आहेत. एवढेच नव्हे तर वर्ग तीनची नगर परिषदेच्या आस्थापनेतील ११ पदेही रिक्त असून ती भरण्याची मागणी होते.
पालिकेत महत्त्वाच्या रिक्त पदांमुळे एका कर्मचाऱ्यावर तीन विभागांचा कार्यभार साेपवल्याने त्यांचा ताण वाढला आहे. शहराचा वाढता व्याप व वाढती लोकसंख्या पाहता या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे. संवर्गासह विविध कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने याबाबत पालिका प्रशासनाकडून अनेकदा अहवाल पाठवण्यात आला. परंतु पालिकेत कर्मचारी येण्यास इच्छुक नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्रशासन व नगरविकास खात्याने लक्ष द्यावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.