आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:मालमत्ता मूल्यांकनावर 1860 हरकती; बाळापूरमधील नागरिकांनी महापालिका कार्यालयात केले आंदोलन

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांची मोजणी होते आहे. मोजणीनंतर नव्याने मूल्यांकन करून मालमत्ता कर वसुलीची बिल नागरिकांना देण्यात आली आहे. या बिलांवर १ हजार ८६० मालमत्ताधारकांनी हरकत नोंदवली. त्यात महापालिका हद्दीत आलेल्या मालमत्ताधारकांचा समावेश आहे. हद्दवाढीच्या भागात सुविधा मिळत नसताना वाढीव बिले दिली जात असल्याने नाराजी आहे.

महापालिकेने मालमत्तांचे सर्वेक्षण केले. त्यासाठी ठेका देण्यात आला. ड्रोन व सॅटेलाइट मॅपिंगद्वारे सर्व मालमत्तांची मोजणी करण्यात येऊन मूल्यांकन केले. त्यानंतर मालमत्ताधारकांना कराची पावती देण्यात आली. मालमत्ता मूल्यांकनावर आत्तापर्यंत १ हजार ८६० मालमत्ताधारकांनी हरकत नोंदवली आहे.

आधी सुविधा द्या : मूल्यांकनाविषयी बाळापूर शिवारातील एकता नगरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सोमवारी निवेदन दिले. रस्ता, पथदिवे, गटारी, पाण्याची सोय नसताना महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वाढला आहे. तो कमी करावा, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...