आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे तालुक्यात ३३ गेटेड सिमेंट काँक्रीट बंधारे बांधण्यात येणार आहे. त्यासाठी १९ काेटी ३३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. बंधाऱ्यांमुळे तालुक्यातील ५९१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली. सुधाकर नाईक यांची पुण्यतिथी व महाराष्ट्र जलसंधारण दिनी हे काम मंजूर झाले.
धुळे तालुक्यात सिंचन क्षमता वाढवून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी अामदार पाटील यांचे प्रयत्न अाहे. त्यासाठी अनेक कामे केली जात आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे साठवण क्षमता वाढून भूजल पातळी वाढणार आहे. बंधाऱ्यांचे काम मंजूर व्हावे यासाठी आमदार कुणाल पाटील यांनी जलसंधारण विभागाकडे प्रयत्न केले. त्यानूसार एकूण ३३ गेटेड सिमेंट काँक्रीट बंधारे मंजूर झाले आहे. या बंधाऱ्यांची एकूण साठवण क्षमता १५४०.३७ घ.मी. आहे. त्यानुसार देऊर, दापुरा, चिंचवार, उभंड, खंडलाय, कौठळ, मोरशेवडी, सडगाव, सरवड, कुंडाणे, नगाव, जापी येथे प्रत्येकी दाेन, लोहगड, मेहरगाव, रावेर येथे एकूण ६ बंधारे, विंचूरला तीन, देवभाने, कापडणे, शिरुड, वडजाई येथे बंधारा होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.