आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता उपकरण:तालुका विज्ञान प्रदर्शनात किमयाच्या स्वच्छता उपकरणाला प्रथम क्रमांक

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शारदा कन्या माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी किमया युवराज राठोड हिच्या आरोग्य व स्वच्छता विषयावरील उपकरणास तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला आहे.

विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात किमया राठोड हिने आरोग्य व स्वच्छता या विषयावर अतिशय उपयुक्त ठरणारे उपकरण सादर केले होते. परीक्षकांनी या उपकरणास सर्वाधिक गुण दिले. त्याबद्दल किमया हिस शहादा तालुका एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पाटील यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देण्यात आले. यावेळी तिच्यासोबत मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका पाडवी, विज्ञान शिक्षक प्रवीणचंद्र सोनवणे उपस्थित होते. किमया राठोड हिचे सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव, सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव, संस्थेचे समन्वयक संजय राजपूत, मुख्याध्यापिका एस. झेड. सय्यद, पर्यवेक्षक एन. बी. कोते यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...