आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बस उलटून बालिकेसह 2 वऱ्हाडी ठार; साधेपणाने उरकला विवाह

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील भडगावबारी येथे खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात लग्नाच्या वऱ्हाडातील वृद्ध महिला व बालिका ठार झाली. अपघातामुळे विवाह साध्या पद्धतीने झाला. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला.भडगाव शिवारातून जाणाऱ्या खासगी बसने (एमएच-४१-एजी-९८०५) लग्नाचे वऱ्हाड साक्रीकडे निघाले होते. ही बस मालेगावहून निघाली होती. रस्ता खराब असल्यामुळे भडगाव येथील बारीमध्ये बस उलटली.

अपघातात मखमलबाई बारकू व्हयाळीज (रा. सायना, ता. मालेगाव, जि. नाशिक), मयूरी विकास बोरसे (रा. शिर्डी, जि. अहमदनगर) हे दोघे ठार झाले. तसेच २५ प्रवासी जखमी झालेे. त्यात मीराबाई विकास बोरसे, निकिता चेतन सावळे, चित्रा गुलाब सावळे, सुवर्णा मधुकर सावळे, रवीना समाधान सावळ, गायत्री ज्ञानेश्वर सावळ, बापू विठ्ठल सावळे, सरिता अनिल खैरनार, लावण्या रवींद्र चव्हाण, रेश्मा ज्ञानेश्वर सावळे, कुसुम मन्साराम अहिरे हे जखमी झाले.

परिसरातील नागरिकांनी जमखींना रुग्णालयात दाखल केले. या वेळी मखमलबाई व मयूरी यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी मंगेश खैरनार यांच्या तक्रारीवरून साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाह सोहळा झाल्यावर लागलीच झाले रवाना...
पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोळ्यासाठी हे वऱ्हाड जात होते. अपघातानंतर साध्या पद्धतीने विवाह सोहळा झाला. त्यानंतर नातलग रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...