आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात महापालिकेतर्फे विविध भागात सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहे. त्यातील बहुतांश शौचालयांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसाेय होते. शौचालयांच्या दुरुस्तीसाठी साधारणपणे २ कोटींची आवश्यकता आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासन शहरातील नागरिकांना वैयक्तीक शौचालयांचा वापर जास्तीत जास्त करावा, असे आवाहन करते आहे.
कारण दरवर्षी सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचा मोठा खर्च करावा लागतो. शहरातील काही सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती खराब झाली आहे. अनेक शौचालयांचे दरवाजे तुटले असून ड्रेनेज व्यवस्था, पाण्याची टाकी फुटली आहे. काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही. काही ठिकाणी पथदिवे नाही.
शौचालयांची वेळेवर स्वच्छता होत नाही.ज्या भागात शौचालय आहे त्या भागातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. याविषयी नागरिकांच्या महापालिका प्रशासनाकडे तक्रारी वाढल्या आहे. नगरसेवकही या विषयाकडे लक्ष वेधतात. महासभा, स्थायी समितीच्या सभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
त्यानंतर प्रशासनाने शहरातील सर्व भागातील सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण करण्याचे ठरवले. दुसरीकडे नागरिकांना वैयक्तीक शौचालय बांधून त्यांचा वापर करण्यासाठी प्रवृत्त केले जाते आहे. कारण सार्वजनिक शौचालय ही संकल्पना शासन कालांतराने बंद करणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी दाट वस्ती आहे. वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी पुरेशी जागा नाही, ज्या भागातील शौचालयांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे त्यांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेला धोरण ठरवावे लागणार आहे. स्वच्छतागृह दुरूस्तीसाठी मनपा काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे.
शहरात १४४ सार्वजनिक शौचालय : शहरातील विविध भागात १४४ सार्वजनिक शौचालय आहे. त्यातील काही शौचालयांची दुरवस्थाझाली आहे. तसेच १२ शौचालय धोकादायक स्थितीत आहे. बांधकाम विभागाने याविषयी सर्वेक्षण केले असल्याची माहिती देण्यात आली.
दुरूस्तीसाठी प्रस्ताव प्राप्त
शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्याअनुशंगाने शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात बहुतांश शौचालयांची सेप्टीकटँक फुटली असून स्लॅब खराब झाला आहे. तसेच दरवाजे, खिडक्यातुटले असल्याचे आढळून आले आहे. शौचालय दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. उपलब्ध निधीप्रमाणे दुरुस्ती करण्यात येईल असे बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.
...तर वर्षाला दीड कोटी रूपये वाचतील
शहरात सार्वजनिक शौचालयांचा वापर कमी करुन नागरिकांनी वैयक्तीक शौचालयांचा वापर करणे गरजेचे आहे. शासनाचे ही धोरण वैयक्तीक शौचालयांना प्राधान्य देण्याचे आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीवर वर्षाला दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च वाचेल. ज्या ठिकाणी सेफ्टी टँक बाधावयास जागा नाही. तेथे काही घरांनी मिळून ड्रेनेज लाईन टाकून ही लाइन मुख्य ड्रेनेज लाईनला जोडावी.- विजय सनेर, उपायुक्त, मनपा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.