आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२ लाख १९ हजारांचा गंडा:खोट्या पटसंख्येद्वारे २ लाख १९ हजारांचे लाटले अनुदान; शहरातील एका शाळेवर ११ वर्षांनंतर गुन्हा केला दाखल

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गल्ली क्रमांक आठमधील गुरू कन्हय्यालाल प्राथमिक विद्यामंदिराने खोटी पटसंख्या दाखवून लाटलेल्या अनुदान प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सन २०११ मध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणात सुमारे २ लाख १९ हजारांचा गंडा घालण्यात आला होता.

शहरातील सुभाषनगर परिसरात गुरू कन्हय्यालाल प्राथमिक विद्यामंदिर आहे. या विद्यालयाने खोटी पटसंख्या नोंदवून अधिक विद्यार्थी दर्शवले. त्यानंतर शासनाकडून मिळणारे मोफत पुस्तके, पोषण आहार व इतर अनुदान लाटले. शिक्षण विभागाने ३ ते ५ ऑक्टोबर २०११मध्ये केलेेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेत हा प्रकार समोर आला. पटावर एकूण ३२३ विद्यार्थी दाखवलेले असताना प्रत्यक्षात शाळेत १५४ विद्यार्थीच होते. तब्बल १६९ बोगस विद्यार्थ्यांची खोटी माहिती नमूद करण्यात आली होती. शाळेने शासनाला २ लाख १९ हजार ५७९ रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी उपशिक्षणाधिकारी मनीष राजाराम पवार (रा. त्रिमूर्तीनगर, गोंदूररोड, देवपूर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शाळेचे तत्कालीन अध्यक्ष अशोक बन्सीलाल कोटेचा यांच्यासह उपाध्यक्ष, खजिनदार, चिटणीस, उपचिटणीस, मुख्याध्यापिका रेखा बुधाजी चौधरी यांच्या विरोधात आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...