आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:33  हेक्टरवर असलेले 2  हजार 895  अतिक्रमण 31  डिसेंबरपर्यंत निघणार

धुळे5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आणि राज्य शासनाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ३३ हेक्टर गायरान जमिनीवरील २ हजार ८९५ अतिक्रमण हटवण्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या आहे. हे अतिक्रमण ३१ डिसेंबरच्या आत काढावे, असे निर्देश दिले आहे. या निर्णयामुळे नाराजी असून, आंदोलन होण्याची शक्यता आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भात माहिती मागवण्यात आली. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याचा, योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. गायरान जमिनीवरील नियमानुकूल बांधकामे, शासकीय बाधंकामांबाबत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनेनंतर योग्य तो निर्णय होणार आहे. निर्देशानुसार अतिक्रमणे काढण्यासाठी सरकारने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून दिला आहे.

त्यानुसार अतिक्रमणधारकांना तहसील कार्यालयामार्फत नोटिसा बजावण्यात येत आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटवल्यास अनेकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहणार आहे. गायरान जमिनीवर निवासी अतिक्रमणासह दुकान, शासकीय योजनेतील घरकुल, वसतिगृह आहे. जी शासकीय घरकुले, इतर शासकीय बांधकामे नियमानुकूल झाली असतील त्यांना अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईतून अभय मिळू शकेल, अशी शक्यता व्यक्त होते आहे.

किती आहे अतिक्रमण
साक्रीत ४८९, सामोडेत ४७७, जैताणेत ५५०, दोंडाईचात ११५, शिरपूर तालुक्यात १ हजार २६४ अतिक्रमण आहे. जिल्ह्यात एकूण गायरान क्षेत्र ६ हजार ९०८.१४ हेक्टर असून त्यापैकी ३२.७४ हेक्टरवर २ हजार ८९५ अतिक्रमण आहे.

बातम्या आणखी आहेत...