आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील ३१ हजार ग्राहकांनी ९ कोटींचे वीज बिल थकवले आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबवली जाते आहे. वीज बिल न भरणाऱ्या २ हजार २ थकबाकीदारांचा वीजपुरवठा दिवाळीत खंडित करण्यात आला.
जिल्ह्यात ३ लाख १४ हजार ९२६ घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यापैकी ३१ हजार २४३ ग्राहकांकडे ९ कोटी ९५ लाखांची थकबाकी आहे. औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी ३८ लाखांची, वाणिज्यिक ग्राहकांकडे २ कोटी ३२ लाख, सार्वजनिक सेवांकडे ८६ लाखांची थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर वीज वीज बिल न भरणाऱ्या २ हजार २ ग्राहकांचा वीजपुरवठा ऑक्टोबरमध्ये खंडित करण्यात आला आहे.
पाणी योजनांचे १०७ कोटी रुपये थकले
जिल्ह्यातील ९५० सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे १०७ कोटी ७९ लाखांचे वीज बिल थकले आहे. तसेच शासकीय कार्यालयांकडे २७९.७६ कोटींची थकबाकी आहे. ४ हजार १६७ व्यावसायिक ग्राहकांनी २ कोटी ३२ लाखांचे वीज बिल थकवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.