आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदनाचे रोपवाटपाचा कार्यक्रम:चंदनाच्या २ हजार रोपांचे केले वाटप ; कोयलीविहीर येथील मेळाव्यात याहामाेगी शेतकरी कंपनीचा उपक्रम

अक्कलकुवा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोयलीविहीर येथे याहामोगी शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मेळावा व चंदनाचे रोपवाटपाचा कार्यक्रम माेठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी होत्या.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आमश्या पाडवी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, जि.प. सदस्य प्रताप वसावे, कृषी सभापती गणेश पराडके, जवराबाई पाडवी, जि.प. सदस्य सुहास नाईक, शंकर पाडवी, पं.स. सदस्य जेका पाडवी, अशोक राऊत, लक्ष्मण वाडिले, रवींद्र गुरव, पीक संरक्षण विशेषज्ञ पद्माकर कुंटे, कृषी विशेषज्ञ उमेश पाटील,उद्यान विद्या विशेषज्ञ देसले, कृषी विज्ञान केंद्राचे प्राचार्य राजेंद्र दहातोंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी नीलेश गढरी, कृषी अधिकारी प्रकाश खरमाडे, देव, ललित जाट उपस्थित होते.

आरंभी याहामोगी मातेच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले जावे, त्यांना सुधारित, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी मेळाव्याचे आयाेजन व चंदन वृक्षाच्या रोपांचे वाटप केले जात असल्याचे आमदार आमश्या पाडवींनी सांगितले. उपस्थित शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते २ हजार चंदन रोपांचे वाटप करण्यात आले. राजेंद्र दहातोंडे, उमेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. यशस्वितेसाठी तुकाराम वळवी, रोहित चौधरी, रावेंद्र चंदेल, शाकीब पठाण, दीपक मराठे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...