आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदोन्नती नाकारली:20 शिक्षकांनी पदोन्नती नाकारली, आता तीन वर्षे मिळणार नाही लाभ; 60 शिक्षक ठरले पात्र, पारदर्शक पद्धतीने पार पडली प्रक्रिया

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यासाठी शुक्रवारी प्रक्रिया राबवण्यात आली. समुपदेशन पध्दतीने पदोन्नती देण्यात आली. या प्रक्रियेत ४ उर्दु आणि ५६ मराठी माध्यमांच्या शिक्षकांनी पदोन्नतीचा स्विकार केला. उर्दु शाळेतील एक आणि मराठी माध्यमाच्या शाळेतील १९ शिक्षकांनी पदोन्नती नाकारली. त्यामुळे आता पुढील तीन वर्षापर्यंत या शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न दोन वर्षापासून प्रलंबित होता. शिक्षक संघटनांच्या मागणी आणि पाठपुराव्यानंतर शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात पदोन्नतीसाठी समुपदेशन झाले. या वेळी पदोन्नती समितीच्या अध्यक्षा तथा मुख्यकार्यकारी अधिकारी वान्मती सी, सदस्य तथा उपमुख्यकार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विलास गांगुर्डे, समाज कल्याण अधिकारी पी. एम. सोनवणे, शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनिष पवार आदी उपस्थित होते.

या वेळी प्रत्येक पदोन्नती पात्र शिक्षकांना जिल्ह्यातील रिक्त जागा स्क्रिनवर दाखवत त्यांना जागा निवड करण्याची संधी देण्यात आली. उर्दू माध्यमांच्या ५ आणि मराठी माध्यमांच्या ७६ जागांवर पदोन्नती देण्यासाठी प्रक्रिया झाली. त्यात उर्दु माध्यमातील ४ शिक्षकांनी मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीचा स्विकार केला तर एका शिक्षकांने नकार दिला. तसेच मराठी माध्यमाच्या शाळेतील ५६ जणांनी पदोन्नतीचा स्विकार केला तर एक शिक्षक निवृत्ती झाल्याने त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळू शकला नाही. तसेच १९ जणांनी पदोन्नती घेण्यास नकार दिला. नकार देतांना वैयक्तीक कारणे पुढे करण्यात आली. ज्यांनी पदोन्नती नाकारली आहे. त्यांना पुढील तीन वर्ष पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही.

पडताळणी केल्यानंतरच घेण्यात आला निर्णय
पदोन्नतीसाठी चारही गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावर विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख व लिपिक यांची समिती नेमून पदोन्नती पात्र शिक्षकांचा सेवा तपशील, मूळ सेवा पुस्तकातील नोंदी व कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी झालेल्या शिबिराला उपस्थित असलेले जिल्हाभरातील शिक्षक.

बातम्या आणखी आहेत...