आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:महापालिका आवारात थुंकल्याने 200 रु. दंड

धुळे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर सौंदर्यीकरण अभियानाच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत विशेष कृती आराखडा आयुक्त देविदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका प्रशासकीय इमारतीच्या आवारात थुंकतांना आढळल्याने एका नागरिकाला पथकाने २०० रुपयांचा दंड केला.महानगरपालिका आवारात तंबाखूविरोधी पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. बुधवारी या पथकाच्या तपासणीत नवीन महानगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या आवारात थुंकताना आढळल्याने एका नागरिकास दोनशे रुपये दंड प्रस्तावित करून वसूल करण्यात आलेला आहे.

महापालिका प्रशासकीय इमारतीत मोठ्या प्रमाणात नागरिक दररोज विविध प्रकारच्या कामांसाठी येतात. त्यामुळे महापालिकेच्या इमारतीत कर्मचारीच्या व्यतिरिक्त बाहेरून येणाऱ्या नागरिकांचाही वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यात तंबाखू खाणारे नागरिकही आहे. महापालिकेच्या इमारतीच्या सिमेंट बीम मोठ्या प्रमाणात गुटखा, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले आहे.

नियमित कारवाईची अपेक्षा
मनपा आवारात येणाऱ्या व कर्मचाऱ्यांनाही तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी चांगलीच शिस्त लावली हाेती. त्यांनी अनेकदा अचानक कर्मचारी, नागरिकांची तपासणी करून दंड केला होता. त्यामुळे केवळ अभियानापुरती ही कारवाई न करता नियमित करावी असे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...