आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • 200 Student Soldiers Participated In The Campaign In The City; After The Immersion, Cleaning Of The River Banks, Collection Of Idols Was Also Done With Nirmalya| Marathi News

विधायक:शहरातील मोहिमेत 200 छात्रसैनिक झाले सहभागी; विसर्जनानंतर नदी किनारी स्वच्छता, निर्माल्यासह केले मूर्तींचेही संकलन

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशमूर्ती विसर्जनानंतर पांझरा नदी किनारी निर्माल्य जमा झाले होते. या पार्श्वभूमीवर ४८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीतर्फे नदी किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोहिमेत २०० छात्रसैनिकांसह एनसीसी अधिकाऱ्यांनी सहभाग नोेंदवला. समादेशक अधिकारी कर्नल पराग कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

गणपती विसर्जनानंतर छात्रसैनिकांनी देशभर स्वच्छता मोहीम राबवली. मोहिमेत ७४ हजार छात्रसैनिकांनी देशभरातून सहभाग नोंदवला होता. या अभियानांतर्गत धुळ्यातही छात्रसैनिकांनी स्वच्छता अभियान राबवले. शहरातील गणपती पूल ते लहान पुलाच्या दरम्यान नदी किनारी जमा झालेले निर्माल्य व प्लास्टिक कचरा संकलित केला. एनसीसी महानिदेशकांच्या आदेशानुसार देशभरात पुनित सागर अभियान सुरू आहे. त्यानुसार हा उपक्रम झाला. या वेळी एनसीसी अधिकारी कॅप्टन के.जी. बोरसे, कॅप्टन के.एम. बोरसे, कॅप्टन डाॅ.महेंद्रकुमार वाढे लेफ्ट. पंकज देवरे, लेफ्ट. शशिकांत खलाणे, चीफ ऑफिसर एन. व्ही नागरे, पी. यू. पवार, ए. टी. गोरे, प्रतिज्ञा बोरसे, अल्तमश खान, एस. टी. पाटील, सुभेदार मेजर सुभाष सिंग, जेसीओ इंदरसिंग, एनसीओ राजवीर, राजेंद्र पवार, संदीप आहेर आदी उपस्थित होते.

शिरपूर शहरात दीड टन निर्माल्य, कचरा संकलन

गणेशमूर्ती विसर्जनानंतर शिरपूर शहरातील नदी काठावर जमा झालेले निर्माल्य व कचरा संकलनासाठी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत दीड टन कचरा व निर्माल्य जमा झाले. विद्यार्थिनींनी नदीत विसर्जित केलेल्या काही गणेशमूर्ती संकलित केल्या.येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय व कमलाबाई बर्वे कनिष्ठ महाविद्यालयाने हा उपक्रम राबवला.

प्राचार्य सारिका रंधे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवण्यात आले. गणेशमूर्ती विसर्जन केलेल्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. अरुणावती नदीपात्रात जमा झालेले निर्माल्य जमा झाले. या वेळी सोनाली पाटील, आश्विनी पाटील आदी उपस्थित होते. विद्यार्थिनींनी हातात झाडू घेऊन संपूर्ण नदीकाठ झाडला. विसर्जित केलेल्या गणपती मूर्ती वाहून काठावर आल्या होत्या. त्या मूर्ती संकलित करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...