आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेनेतर्फे पोलिस भरती पूर्व मैदानी व लेखी सराव परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत २०० जणांनी सहभाग नांेदवला. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली. या उपक्रमांतर्गत १६०० मीटर धावणे, गोळाफेक, १०० मीटर धावणे आदी चाचण्या घेण्यात आल्या. ८६ युवक-युवतींनी मैदानी चाचणीत यश मिळवले.
त्यानंतर श्रीमती पी. बी. बागल महाविद्यालयात लेखी परीक्षा झाली. परीक्षेला ८० विद्यार्थी हजर होते. पुरुष गटात लेखी व मैदानी चाचणीत १५० पैकी १२३ गुण मिळवत भूषण कांतिलाल गुरव हा पहिला आला. त्याला रोख ८ हजार १११ रुपये व सन्मान चिन्ह देण्यात आले. द्वितीय क्रमांक पंकज बबन पाटीलने मिळवला.
त्याला ५ हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. तृतीय क्रमांक हिमांशू भास्कर पाटीलने मिळवला. महिला गटातून मनीषा शिवा महानोरने ९४ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. तिला ३ हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. योगिता श्रीराम सावळेने द्वितीय, अश्विनी प्रकाश भावसारने तृतीय क्रमांक मिळवला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, युवासेनेचे सहसचिव यशवर्धन कदमबांडे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कोळी यांच्यातर्फे बक्षीस देण्यात आली. या वेळी हेमंत साळुंके, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, प्राचार्य डॉ. वाल्हे, के. एस. पाटील, भटू पाटील, कमलेश काळे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. शिवसेनेचे उपजिल्हासंघटक भाईदास पाटील, उपतालुका प्रमुख शैलेश सोनार, उपतालुका युवाधिकारी सुमीत देशमुख, प्रदीप पवार, दीपक मराठे, नरेंद्र धात्रक, गणेश विसावे, नीलेश मराठे, भटू कोळी, आकाश शिंदे, सौरभ पाटील, जयदीप आघाव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयेश भोई, भूषण चौधरी, मनोज कुंभार, संदीप निकम, आकाश नगराळे, मयूर निकम, प्रा. प्रवीण पाटील, नीलेश पाटील, मयूर पाटील, रवींद्र सदाराव यांनी प्रयत्न केले. भरतीसाठी इच्छुक असलेल्यांचा सराव व्हावा यासाठी हा उपक्रम झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.