आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेताना ताब्यात:वाहन सोडवण्यासाठी २० हजारांची लाच; पंटरसह पोलिसाला पकडले

धुळे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील देवभाने येथे जि.प. शाळेजवळ वाहन सोडवण्यासाठी २० हजारांची लाच पंटरमार्फत घेताना पोलिसाला ताब्यात घेण्यात आले. ज्ञानेश्वर कोळी असे या पंटरचे तर संजय जाधव असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

शहरातील तरुणाच्या भावाचे लग्न होते. पत्रिका वाटप करण्यासाठी त्याने मित्राकडून अॅक्टिवा आणली होती. पोलिस कर्मचारी संजय मधुकर जाधव यांनी हे वाहन अडवून त्यात दारूच्या बाटल्या मिळाल्यामुळे ताब्यात घेतले होते. त्यामुळे तक्रारदार हे वारंवार संजय जाधव यांच्या संपर्कात होते. वाहन सोडवण्यासाठी ७५ हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती २० हजार देण्याचे ठरले. याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली होती. देवभाने गावातील जि.प. शाळेजवळ पंटर ज्ञानेश्वर कोळी याच्या मार्फत संजय जाधव यांना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अनिल बडगुजर व त्यांच्या पथकातील अधिकारी मंजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे, कर्मचारी राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे, भुषण खलाणेकर, संतोष पावरा, भूषण शेटे आदींनी कारवाई केली.

पथकाकडून घरझडती
कारवाईनंतर जाधव व कोळी यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आणले. एकीकडे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असताना एक पथक जाधव यांच्या घरी झडतीसाठी गेले; परंतु त्यात काहीही आढळून आले नाही, अशी माहिती पथकाने दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...