आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्हा नियाेजन समितीवर २२ सदस्य बिनविराेध ; समितीवर भाजपचे वर्चस्व

धुळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा नियाेजन समितीच्या २३ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला हाेता. त्यासाठी २३ जागांसाठी ३२ उमेदवारांनी अर्ज भरले हातेे. सोमवारी माघारीनंतर २३ पैकी २२ जागा बिनवरेध झाल्यात. त्यात लहान नागरी क्षेत्र, माेठे नागरी क्षेत्राच्या जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज शिल्लक असल्याने लहान व माेठे नागरी क्षेत्राची निवडणुक बिनविराेध झाली. मात्र संक्रमित क्षेत्रातील एका जागेसाठी दाेन उमेदवार असल्याने २१ सप्टेंबर राेजी निवडणूक हाेणार आहे. तर नियाेजन समितीवर भाजपाचे वर्चस्व असल्याचे दिसून आले.

मागारीच्या शेवटच्या दिवशी ग्रामीण नागरी क्षेत्रातील चार व माेठे नागरी क्षेत्रासह संक्रमणकालीन क्षेत्रातील जागेतून प्रत्येकी एकाने माघार घेतली. त्यामुळे ही निवडणुक बिनविराेध झाली. त्यात लहान(ग्रामीण) नागरी क्षेत्रातून महिलांच्या जागांवर ज्याेती बाेरसे, शालिनी पाटील, सुमित्रा गांगुर्डे आणि अभिलाषा पाटील, जताबाई पावरा, धरती देवरे, सुदामती गांगुर्डे बिनविराेध झाल्या.तर पुरूषाच्या गटातून हर्षवर्धन दहिते, राघवेंद्र मनाेहर पाटील, महावीर रावल, संजय पाटील, देवेंद्र पाटील, ललित वारूड, आनंद पाटील यांची बिनविराेध निवड करण्यात आली. तर अनुसूचित जातीच्या एका जागेतून सुधीर सुधाकर जाधव हे बिनविराेध झाले.

सदस्य निवड झाली; पालकमंत्रीच नाही
तीन वर्षापासून केवळ पालकमंत्र्यामार्फतच जिल्हा नियाेजन समितीचा कारभार सुरू हाेता.सदस्य निवड झाली नव्हती. मात्र आता निमंत्रित व निवडणुकीद्वारेही सदस्यांची निवड झाली आहे.परंतु पालकमंत्रीच नसल्याने नियाेजन समितीला अध्यक्षच नाही. नवीन पालकमंत्र्यांची घाेषणा झाल्यानंतरच समितीचे कामकाज सुरू हाेईल.

माेठ्या क्षेत्रातील बिनविराेध सदस्य
माेठ्या क्षेत्रातील सात जागांसाठीही सातच अर्ज शिल्लक राहिल्याने त्यातून सात जणांची बिनविराेध निवड करण्यात आली.त्यात सर्वसाधारण गटातून हर्षकुमार रेलन,देवेंद्र साेनार, महिला गटातून सुरेखा उगले,भारती माळी तर नागरीकांचा मागास प्रवर्गातून सुनील साेनार आणि प्रतिभा चाैधरी यांची बिनविराेध निवड करण्यात आली. तर यापूर्वीच माेठे नागरी क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या जागेवर सुशिला ईशी यांची बिनविराेध निवड करण्यात आली आहे.

संक्रमित क्षेत्रासाठी वानखेडे-नागरे आमनेसामने
समितीच्या संक्रमित क्षेत्राच्या एका जागेसाठी शिंदखेडाचे अनिल वानखेडे आणि साक्रीचे सुमित ज्ञानेश्वर नागरे ह्या दाेघांनी अर्ज भरले हाेते. शेवटपर्यंत माघारीचे प्रयत्न सुरू हाेते.मात्र दाेघांनीही माघार घेण्यास नकार दिल्याने या जागेसाठी अनिल वानखेडे व सुमित नागरे हे आमने सामने आहेत. त्यासाठी २१ राेजी सप्टेंबर राेजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यात नागरे हे शिंदे गटाचे तर वानखेडे भाजप गटाचे आहेत.साक्रीत १७ व शिंदखेडाचे १८ असे ३५ मतदारांच्या हाता या दाेघांचे भवितव्य आहे.

बातम्या आणखी आहेत...