आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी महामंडळाच्या धुळे आगारातून डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत शैक्षणिक सहलीसाठी बसला चांगली मागणी होती. या काळात सहलीसाठी २२४ फेऱ्यातून ७३ लाख ६३ हजार ४२१ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. एसटी महामंडळाने शाळांना सहलीसाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली.
धुळे आगारातून डिसेंबर महिन्यात १०३ बस सहलीसाठी देण्यात आल्या. या बस ८५ हजार ९९० किलोमीटर धावल्या. त्यातून २९ लाख ८२ हजार ९८० रुपये मिळाले. जानेवारी महिन्यात १०६ बस सहलीसाठी देण्यात आल्या. त्या १ लाख १४ हजार ६४० किलोमीटर धावल्या. या महिन्यात सहलीतून ३९ लाख ३३ हजार ७४१ रुपये उत्पन्न मिळाले. फेब्रुवारी महिन्यात १५ बस सहलीसाठी देण्यात आल्या. त्या ७ हजार ९०० किलोमीटर धावल्या. त्यातून ४ लाख ४६ हजार ७०० रुपये उत्पन्न मिळाले. तीन महिन्यांत २२४ फेऱ्यातून ७३ लाख ६३ हजार ४२१ रुपये उत्पन्न मिळाले. आता सहलीचा हंगाम संपला आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाने विवाह सोहळ्यासाठी प्रासंगिक कराराने बस उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे.
सप्तशृंगी देवीच्या यात्रेसाठी जादा बस सोडणार
शैक्षणिक सहलीसाठी सर्व शाळांना बस उपलब्ध करून देण्यात आल्या. आंतरराज्य प्रवासासाठीही बस दिल्या. आतादे खील गर्दीचा हंगाम असल्याने विविध मार्गावर जादा फेऱ्यांचे नियोजन आहे. सप्तशृंगी देवीच्या यात्रेसाठीही जादा बस सोडण्याचे नियोजन आहे. - स्वाती पाटील, आगार व्यवस्थापक, एसटी महामंडळ, धुळे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.