आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:8 दिवसांत 10 ठिकाणी श्रमदानातून 25 बंधारे

धुळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे आणि शिंदखेडा तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. त्यानुसार लुपीन ह्युमन अॅण्ड वेल्फेअर फाउंंडेशनच्या सोनगीर युनिटतर्फे ८ दिवसात १० गावांत २५ वनराई बंधारे बांधण्यात आले. श्रमदानातून हा उपक्रम राबवण्यात आला. खरीप हंगाम संपला असून शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करता आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतशिवारातील नाले वाहता आहे.

नाल्यातून वाहून जाणाऱ्या पाणी अडवले तर रब्बी हंगामात त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर वनराई बंधाऱ्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते. ही बाब लक्षात घेऊन लुपिन ह्युमन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे सोनगीर युनिटअंतर्गत अमराळे, दराणे-रोहाणे, कलमाडी, सवाई मुकटी, माळीच, वाघोदे, वालखेडा, तामथरे, डांगुर्णे या गावात २५ वनराई बंधारे बांधण्यात आले. आठ दिवसांत हे काम झाले. बंधारे बांधण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाणे, प्रकल्प समन्वयक चंदन टोकक्षा, कुशावर्त पाटील,योगेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिमित्र राकेश देवरे, कैलास पाटील, योगेश थोरात, प्रभाकर नगराळे,कृष्णा खैरनार यांनी प्रयत्न केले.

सामाजिक उपक्रमांवर भर
लुपिन फाउंंडेशनच्या माध्यमातून बेटर कॉटन उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्यात येते आहेे. कापूस लागवड, व्यवस्थापन, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, बोंडअळी व्यवस्थापनावर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते आहे.

बातम्या आणखी आहेत...