आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:धुळ्यातील उद्योजकाला 25  लाखांचा घातला गंडा

धुळे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून जवळ असलेल्या अवधान एमआयडीसीमधील उद्योजकाला सुमारे २५ लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी पुण्यातील कपंनीच्या संचालकाच्या विरोधात मोहाडी पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला.देवपुरातील वाडीभोकर ला लागून राजेश किशोर जगताप ( वय ४१) हे उद्योजक राहतात. त्यांची अवधान एमआयडीसीमध्ये नवनाथ स्पाईस प्रा. लि. नावाने मसाल्याची कंपनी आहे.

या कंपनीकडून पुण्यातील जय लक्ष्मी फ्रूड प्रोसेसिंगने सुमारे २६ लाख ८७ हजार ४८५ रुपयांचा माल घेतला होता; परंतु त्यांचे पैसे दिले नाही. दरम्यानच्या काळात त्यापैकी केवळ १ लाख ७५ हजार रुपये देण्यात आले. तर सुमारे २५ लाख १२ हजार ४२५ रुपये परत केली नाही. याबाबत संपर्क साधल्यावर टाळाटाळ करण्यात आली. अखेर राजेश जगताप यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...