आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक उपक्रम:ई-कारमुळे डिझेलचे 25 हजार दरमहा बचत

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण संरक्षणासाठी महापालिका एक इलेक्ट्रिक कार खरेदी करणार आहे. त्यामुळे एका कारच्या डिझेलवर दरमहा खर्च होणारे २५ हजार रुपये वाचतील.महापालिकेने माझी वसुंधरा अभियानात सहभाग नोंदवला आहे. या अभियानांतर्गत विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जाता आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षारोपण केले जाते आहे. मनपाने आता टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्य:स्थितीत सर्व वाहन पेट्रोल व डिझेलवरील आहे. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, महापौरांसाठी चार कार आहे.

अन्य अधिकारी व पदाधिकाऱ्यांसाठी भाडेतत्त्वाने वाहन घेण्यात आली आहे. या वाहनांच्या इंधन खरेदीवर मोठा खर्च होतो.

त्यामुळे पहिल्या टप्प्यात एक इलेक्ट्रिक कार मनपा घेणार आहे. ही कार एक वेळेस चार्जिंग केल्यावर २१० ते २३० किलोमीटर चालेल. शंभर टक्के चार्जिंगसाठी २६ युनिट विजेचा वापर होईल. ९ रुपये युनिट दराप्रमाणे चार्जिंगचा खर्च एक वेळेस २३४ रुपये येईल. दुसरीकडे एका डिझेल कारला महिन्याला इंधनासाठी ३० हजार रुपये लागतात. इलेक्ट्रिक कारला महिन्याला केवळ ५ हजार रुपये लागतील. त्यामुळे २५ हजारांची बचत होईल. तसेच भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढेल.

बातम्या आणखी आहेत...