आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रमजानसाठी 25 टन खजूर; मदिनाहूनही आवक, बाजारात शंभर रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतचे खजूर विक्रीस, विक्रीही वाढली

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमजान महिन्याला प्रारंभ झाला असून, मुस्लिम समाजबांधव उपवास अर्थात रोजा खजुराचे सेवन केल्यावर सोडतात. या पार्श्वभूमीवर बाजारात खजूर व फळांना असलेली मागणी वाढली आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांनी सुमारे २५ टन खजूर विक्रीसाठी खरेदी केले आहे. अजुवा नामक खजूरला जास्त पसंती असून, हे खजूर थेट अरब राष्ट्रातील मदिना येथून मागवण्यात आले आहे. मुस्लिम समाजबांधव रमजान महिन्यात रोजा ठेवण्यास प्राधान्य देतात. दिवसभराच्या उपवासानंतर सायंकाळी सर्वप्रथम खजुराचे सेवन करून उपवास सोडला जातो. त्यामुळे रमजानमध्ये खजूरला जास्त मागणी असते. या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांनी तब्बल २५ टन खजूर खरेदी केले आहे. मुस्लिमबहुल भागातील बाजारपेठेत खजूर विक्रीचे दुकाने थाटण्यात आली आहे. शहरात एका मोठ्या व्यापाऱ्याने रमजानसाठी पाच टन खजूर मागवले आहे. बाजारात शंभर रुपयापासून १ हजार रुपये किलोपर्यंत खजूर विक्रीसाठी आले आहे.

अजुवा खजुराला पसंती
रमजान महिन्यात आजुवा खजुराला चांगली मागणी असते. हे खजूर पौष्टिक व हृदयासाठीही फायदेशीर असते. या खजुराची १ हजार रुपये किलोने विक्री होते आहे. मदिना येथून या खजुराची आयात करण्यात येते. त्याबरोबरच अंबर, सुक्री या प्रकारचे खजूरही आयात करण्यात येतात. सौदी येथून ट्युनेसिया खजूर आयात केले जाते.

दिवसाला हजार किलो विक्री
शहरातील व्यापारी रमजान महिन्यात दिवसाला साधारणपणे हजार किलो खजुराची विक्री करतात. त्यात पेंडखजूर, अंगुरी, इराणी, उमान, मदिना कलमी, रसगुल्ला या खजुरांचा समावेश असतो. शकीलभाई खजूरवाले, व्यापारी

बातम्या आणखी आहेत...