आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी:85 गावांच्या पाणी योजनेसाठी 274 कोटी

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील ८५ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रस्तावित ग्रीड पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशनमधून २७४ कोटी १९ लाख ४४ हजार रुपये मंजूर केले आहे.

शिंदखेडा तालुक्यातील ८० ते ८५ गावांना पाणीटंचाई जाणवते. या गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आमदार जयकुमार रावल यांनी मंत्री असताना मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या धर्तीवर ८५ गावांसाठी वॉटर ग्रीड योजनेचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने योजना रखडली हाेती. दुसरीकडे आमदार जयकुमार रावल यांनी केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत हर घर जल से नले योजनेतून या कामासाठी निधी मिळावा यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामळे २७४ कोटी १९ लाख ४४ हजार रुपये मंजूर झाले आहे. या गावांचा योजनेत समावेश चांदगड, डांगुर्णे, सोंडले, खलाणे, धांदरणे, डाबली, होळ, दसवेल, टेंभलाय, निरगुडी, दत्ताणे, गव्हाणे, शिराळे, अंजदे, पिंप्राड, निशाणे, महाळपूर, बाभुळदे, चिरणे, कदाणे वाघाडी खु., वाघाडी बु., कंचनपूर, बाभळे, कलमाडी, माळीच, वाघोदे, जातोडे, मेलाणे, गोराणे, विटाई, पिंपरखेडा, सार्वे, वायपूर रोहाणे, दराणे, तामथरे, सवाईमुकटी, चिमठावड, अमराळे, जखाणे चिमठाणे, पिंप्री, दलवाडे प्र.सो., आरावे, शेवाळे, वाडी, दरखेडा परसामळ-कुमरेज, साळवे, सोनशेलू, हातनूर, भडणे, वरूळ-घुसरे, चौगाव, दलवाडे आदी गावांना पाणी मिळेल.

सुलवाडे बॅरेजमधून तापी नदीचे उचलणार पाणी
ग्रीड योजनेंतर्गत तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजमधून पाणी उचलण्यात येईल. चिमठाणे गावाजवळील क्रांती स्मारक शेजारी असलेल्या १५० मीटर उंच डोंगरावर जलकुंभ बांधून त्यात पाणी टाकले जाईल. तेथून गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने ८५ गावांना पाणीपुरवठा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...