आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • 276 Students Participated In Smart India Hackathon, Opportunities For Nationwide Skill Presentation; R. C. Activities Under Smart India In Patel Engineering College |marathi News

शैक्षणिक:स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये 276 विद्यार्थी सहभागी, देशपातळीवर कौशल्य सादरीकरणासाठी संधी; आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडियांतर्गत उपक्रम

शिरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन एसआयएच २०२२ साठी महाविद्यालयीन हॅकेथॉन स्पर्धा झाली. या स्पर्धेत २७६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात ११५ मुली व १६१ मुलांचा समावेश होता, अशी माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ.जे.बी.पाटील यांनी दिली.

मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमधील स्मार्ट इंडिया हॅकेथॉनतर्फे संरक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी भावी अभियंत्यांकडून प्रभावी पर्याय मागवले जातात. त्यासाठी महाविद्यालयीनस्तरावर हॅकेथॉन स्पर्धा होते. महाविद्यालयीन स्तरावरून देशपातळीवरील स्पर्धेसाठी १५ चमूंची निवड करण्यात आली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना देशपातळीवर कौशल्यांचे प्रदर्शन दाखवण्याची संधी मिळाली. प्रा.प्रवीण भोळे, डॉ. जगदीश जाधव, डॉ.रजनीकांत वाघ, डॉ. उज्ज्वला पाटील यांनी मूल्यमापन केले. हॅकेथॉनच्या आयोजनासाठी संगणक विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आकात्सुकी कोडर्स क्लबचे शिक्षक प्रतिनिधी प्रा. रोहिदास सांगोरे, प्रा. शकील पिंजारी, विद्यार्थी प्रतिनिधी शिवांग वोरा, शुभम वोरा, हार्दिक पोरिया, तरुण कुकरेजा, रोहन बडगुजर, रिशिका शर्मा, रितीषा तारे, श्रेया शिंदे व मंगेश सोनवणे यांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...