आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भाटपुऱ्यात शिरपूर पॅटर्नअंतर्गत बांधणार 3 बंधारे; जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे सहकार्य

शिरपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भाटपुरा येथे शिरपूर पॅटर्नअंतर्गत तीन बंधारे बांधण्यात येणार आहे. त्यांचे उद्योगपती चिंतन पटेल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. आत्तापर्यंत तालुक्यात शिरपूर पॅटर्न अंतर्गत ३६५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहे. आमदार अमरीशभाई पटेल, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार आहे. या कामासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे सहकार्य लाभणार आहे. बंधाऱ्यामुळे भाटपुरे, मांजरोद, थाळनेर, सावेरसह अन्य गावांना फायदा होणार आहे.

या वेळी आमदार काशिराम पावरा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, भुलेश्वर पाटील, योगेश बोरसे, जितेंद्र सूर्यवंशी, उज्ज्वल पाटील, धनराज मराठे, रमेश मराठे, राजू धनगर, भाटपुराचे सरपंच श्रावण चव्हाण, उपसरपंच रोशन सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य चिंतामण राठोड, संजय भील, सुभाष भील, बाळा नाईक, चिंतामण राठोड, पोलिस पाटील एकनाथ राठोड, जे. टी. पाटील, शिरपूर पॅटर्नचे अभियंता टी. आर. दोरिक, राजेंद्र पाटील, वसंत पाटील, बन्सीलाल जैन, मुरलीधर पाटील, गजानन कोळी, विनोद जैन, मिश्रीलाल जाधव, भरत राठोड, मनोहरसिंग राठोड, सुभाष राठोड, रणसिंग राठोड, शांतिलाल पाटकर, प्रकाश सोनवणे, श्यामकांत सोनवणे, मिश्रीलाल देवरे, देविदास राठोड, गोपाल गुजर, भगवान माळी, बाळू पाटील, राजाराम कुंभार, माधवराव दोरीक, संतोष कोळी, जगन देवरे, निर्भय बैसाणे, कैलास जाधव, विजय राजपूत, रवींद्र कुंभार आदी उपस्थित होते. आमदार अमरीश पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पाण्याच्या बाबतीत सुजलाम करण्यासाठी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...