आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभ:1 महिन्यात धुळे आगारात एसटीतून‎ 3 लाख महिलांचा प्रवास‎, महिला सन्मान योजनेमुळे प्रवासी संख्येत वाढ‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नसराई, उन्हाळी सुट्टीमुळे एसटी ‎ ‎ महामंडळाच्या बसला गर्दी वाढली ‎ ‎ आहे. तसेच शासनाने महिलांना‎ प्रवास शुल्कात पन्नास टक्के‎ सवलत दिल्याने एक महिन्यापासून ‎ ‎ एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची ‎ ‎ संख्या प्रचंड वाढली आहे.

धुळे ‎आगारातून एप्रिल महिन्यात २ लाख‎ ९१ हजार महिलांनी प्रवास केला.‎ वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी ‎ ‎ महामंडळातर्फे बहुतांश मार्गावर‎ जादा बस सोडल्या जाता आहे.‎ कोरोना, संपामुळे आर्थिक‎ अडचणीत आलेले एसटी‎ महामंडळ आता काही प्रमाणात‎ सावरते आहे.

काही महिन्यापासून‎ यात्रा, लग्नसराई, उन्हाळ्याच्या‎ सुट्टीमुळे बसला असलेली गर्दी‎ वाढली आहे. या संधीचे सोने‎ करण्यासाठी एसटी महामंडळातर्फे‎ जादा बस सोडल्या जाता आहे.‎ काही दिवसापासून धुळे मध्यवर्ती‎ बसस्थानकात सकाळी व‎ सायंकाळी प्रवाशांची गर्दी वाढली‎ आहे. त्यामुळे बस आल्यावर जागा‎ ‎ ‎ ‎ ‎सांभाळण्यासाठी गर्दी होते.‎

सद्य:स्थितीत धुळे मध्यवर्ती बस‎ स्थानकातून दर अर्धा तासाने‎ नाशिकसाठी बस सोडली जाते.‎ पुण्यासाठी दिवसभरात १७ बस‎ धावतात. तसेच १ मेपासून रात्री १०‎ वाजता थेट पुणे बससेवा सुरु झाली‎ आहे. मुंबईसाठी प्रवाशांच्या‎ मागणीनुसार बस सोडल्या जाता‎ आहे.

औरंगाबादसाठी प्रत्येक अर्धा‎ तासाने बस धावते आहे. तसेच‎ जळगाव, नंदुरबार, चोपडा मार्गावर‎ वीस ते तीस मिनिटात बस सुटते. या‎ व्यतिरिक्त माहुरगड, अकोला,‎ नागपूरला जादा बस सोडली आहे.‎

1 कोटींचे मिळाले उत्पन्न‎

शासनाने १७ मार्चपासून महिला‎ सन्मान योजना सुरु केली आहे. या‎ योजनेमुळे महिलांना ५० टक्के‎ शुल्कात प्रवास करता येतो. त्यामुळे‎ बसला गर्दी वाढली आहे. धुळे‎ आगारातून एप्रिल महिन्यात तब्बल‎ २ लाख ९१ हजार ८२४ महिलांनी‎ प्रवास केला. त्यामुळे आगाराला १‎ कोटी ५ लाख ३२ हजार मिळाले.‎ १ कोटींचे मिळाले उत्पन्न‎ शासनाने १७ मार्चपासून महिला‎ सन्मान योजना सुरु केली आहे. या‎ योजनेमुळे महिलांना ५० टक्के‎ शुल्कात प्रवास करता येतो. त्यामुळे‎ बसला गर्दी वाढली आहे. धुळे‎ आगारातून एप्रिल महिन्यात तब्बल‎ २ लाख ९१ हजार ८२४ महिलांनी‎ प्रवास केला. त्यामुळे आगाराला १‎ कोटी ५ लाख ३२ हजार मिळाले.‎