आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:कर मूल्यांकनाच्या नोटीसवर 3 हजार 457 हरकती

धुळे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह महापालिकेच्या हद्दीतील १० गावांमधील सर्व मालमत्तांची मोजणी झाली. त्यानंतर आता मालमत्ताधारकांना कर मूल्यांकनाच्या नोटीस देण्यात आल्या आहे. या नोटिसांवर ३ हजार ४५७ हरकती प्राप्त झाल्या आहे.

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातर्फे शहरातील सर्व मालमत्तांचे मोजमाप होते आहे. या कामाचा मनपाने ठेका दिला आहे. मालमत्ताधारकांना कर मूल्यांकनाच्या नोटीस देण्यात आल्या. अनेकांना पूर्वीपेक्षा जास्त कर वसुलीची बिल देण्यात आली आहे. त्यामुळे या नोटिसीवर हरकत नोंदवण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत ३ हजार ४५७ नागरिकांच्या हरकती प्राप्त झाल्या. त्यात बाळापूरमधून सर्वाधिक ७२४ हरकती प्राप्त झाल्या. सर्वात कमी ३० हरकती नगाव येथून प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली.

हरकतींवर २७ महापालिकेत जूनपासून सुनावणी
मनपा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या हरकतींवर २७ जूनपासून सुनावणी होणार आहे. तसेच पुढील आठवड्यात वलवाडी भागातील मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात येणार आहे. नोटीस तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरात देवपूर भागापासून नोटीस देण्यास प्रारंभ होईल.

बातम्या आणखी आहेत...