आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मिती:छत्रपती संभाजी महाराजांचे शहरात 30 फूट उंच स्मारक; आमदार पाटील यांनी घेतला कामाचा आढावा

धुळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शहरात स्मारक उभारले जाणार आहे. हे स्मारक सुमारे ३० फूट उंच असेल. छत्रपती संभाजी महाराज यांचे राज्यातील हे सर्वात उंच स्मारक असेल. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची शहरातील गोंदूर रोडवरील कार्यशाळेत निर्मिती सुरू आहे. या कामाची छत्रपती संभाजी राजे स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यासह आमदार कुणाल पाटील यांनी पाहणी केली.

शहरातील देवपूर भागातील संभाजी गार्डनमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभे राहणार आहे. गोंदूर रोडवरील कार्यशाळेत पुतळा निर्मितीचे काम सुरु आहे. शिल्पकार सरमद पाटील पुतळा साकारता आहे. आमदार कुणाल पाटील यांनी पुतळा निर्मितीच्या कामाची पहाणी केली. या वेळी शिवसेनेचे महेश मिस्त्री, छावा संघटनेचे किशोर चव्हाण, छत्रपती संभाजी राजे स्मारक समितीचे अध्यक्ष नाना कदम, सचिव अर्जुन पाटील, उपाध्यक्ष प्रदीप जाधव, अ‍ॅड. दिनेश काळे, अ‍ॅड. नितीन पाटील, कोमल अभोले, मनोज पवार, ऋषीकेश पाटील, शिल्पकार सरमद पाटील, साहेबराव खैरनार, रितेश पाटील, गुलाबराव पाटील, पंढरीनाथ पाटील, बापू खैरनार आदी उपस्थित होते.

असे असेल स्मारक
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची ३० फुट असेल. त्यात १८ फूट उंच चबुतरा आणि १२ फूट उंच पुतळा असेल. अष्टधातूचा वापर करून पुतळा तयार केला जात असल्याची माहिती स्मारक समितीतर्फे देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...