आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा सरपंचाची होणार थेट जनतेतून निवड:शिरपूर तालुक्यात ३३ ग्रामपंचायत निवडणुका

शिरपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक आयोगाने शिरपूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.जानेवारी २१ ते मे २२ या कालावधीतील मुदत संपलेल्या व जून २२ ते सप्टेंबर २२ या कालावधीतील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ ऑगस्ट २२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्धी होईल. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट २२ ते १ सप्टेंबर २२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुटीमुळे २७, २८ व ३१ ऑगस्ट २२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही.

नामनिर्देशनपत्रांची छाननी २ सप्टेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० ते ते साय ५:३० या वेळेत होईल. मतमोजणी १९ सप्टेंबर रोजी नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय शिरपूर येथे होईल. या निवडणुका घोषित झल्याने गाव पातळीवर इच्छुकांनी उमेदवारी करण्याची तयारी सुरू केली आहे.

या गावांची निवडणूक झाली जाहीर
शिरपूर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये शिरपूर तालुक्यातील आंबे, भोईटी, बोरपाणी बुडकी, चांदसे- चांदसूर्या, चिलारे, दुर्बड्या, फतेपूर फॉ, गधडदेव, गुऱ्हाळपाणी, हातेड, हेंदऱ्यापाडा, हिगांव, हिवरखेडा, जळोद- उखलवाडी, जोयदा, खैरखुटी, खामखेडा प्रा आंबे, कोडिद, लाकड्या हनुमान, लौकी, मालकातर, मोहिदा, नांदरडे, न्यू बोराडी, निमझरी, पनाखेड, रोहिणी, सांगवी, सुळे, वकवाड, झेंडेअंजन आणि पळासनेर या ग्रामपंचायती निवडणूक होणार असल्याची माहिती तहसीलदार आबा महाजन आणि निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...