आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:पीक विम्यापोटी 34 कोटी मंजूर ; आमदार पाटील, रावल यांचे प्रयत्न, खरिपाच्या पार्श्वभूमीवर दिलासा

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गेल्यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेंतर्गत ३४ कोटींची भरपाई मंजूर झाली आहे. भरपाई वाटपाचे काम एचडीएफसी कंपनी करते आहे. ही नुकसानभरपाई पीक कापणी प्रयोगावर आधारित, अतिवृष्टी व पावसाचा खंड अशी एकत्रित मंजूर झाली आहे. विमा मंजूर व्हावा यासाठी आमदार कुणाल पाटील, आमदार जयकुमार रावल यांनी पाठपुरावा केला. पीक विमा योजनेत तांत्रिक कारणांमुळे जिल्ह्यावर अन्याय होत होता. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९८ कोटी नुकसान भरपाई मिळाली होती. त्यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पीक कापणीची आकडेवारी वास्तव लावली होती. त्यामुळे जिल्ह्याला नुकसानभरपाई जास्त मिळाली होती. तसेच सन २०२० मध्ये पावसाचा खंड पडला. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पण तांत्रिक कारणामुळे योग्य नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे कृषीभूषण अॅड. प्रकाश पाटील याविषयी तत्कालीन जिल्हाधिकारी संजय यादव, खासदार, आमदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांची भेट घेतली होती. तसेच प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी मदत मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न केेले. राजकीय पातळीवर आमदार कुणाल पाटील, आमदार जयकुमार रावल यांनी मदत केली. त्यांनी तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, वाल्मीक प्रकाश, प्रकाश पाटील यांची एकत्रित बैठक घेतली. तसेच पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी वास्तव लावावी. त्यानुसार अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यामुळे जिल्ह्यासाठी विमा योजनेंतर्गत ३४ कोटी रुपये मंजूर झाले आहे. धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी २१ कोटी, शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ९ कोटी २८ लाख, शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना १ कोटी.४९ लाख, साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना १ कोटी ८३ लाख रुपये मंजूर झाले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...