आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:शिरपूर तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी 35 कोटी मंजूर

शिरपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी ३५ कोटी रुपये मंजूर झाले आहे. निधी मंजूर व्हावा यासाठी आमदार अमरीश पटेल व आमदार काशिराम पावरा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधीतून ही रक्कम मंजूर केली आहे.

आमदार अमरीश पटेल यांच्या मागणीनुसार सावळदे एन ५२ ते शिरपूर एमडीआर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी २५ कोटी तर आमदार काशिराम पावरा यांच्या मागणीनुसार बोराडी ते सांगवी रस्त्यासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहे. या रस्त्याचे काम व्हावे, अशी मागणी दिवसांपासून केली जात होती. त्यानुसार आमदार पटेल व पावरा यांनी निधी मिळावा यासाठी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.

बातम्या आणखी आहेत...